ETV Bharat / state

पोलिसांमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे 'कोरोना मार्गदर्शन'

कोरोना संकटकाळात पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होत असल्याने पोलीस विभागाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आज सूर्या कॉलनीतील पोलीस मुख्यालयात पोलिसांना कोरोना विषाणूविषयी आणि प्रादुर्भाव रोखण्याससाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.

पालघर पोलिसांना कोरोना मार्गदर्शन
पालघर पोलिसांना कोरोना मार्गदर्शन
author img

By

Published : Jun 11, 2020, 3:06 PM IST

पालघर - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना संकटकाळात पोलीस आपले कर्तव्य तत्परतेने बजावत आहेत. मात्र, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होत असल्याने पोलीस विभागाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आज पालघर सूर्या कॉलनीतील पोलीस मुख्यालयात पोलिसांना कोरोना विषाणूविषयी आणि प्रादुर्भाव रोखण्याससाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. covid-19 पथकाचे तालुका प्रमुख डॉ. तन्वीर यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या या संकट काळात आपल्या पोलीस आपले कर्तव्य तत्परतेने बजावत आहेत. नाकाबंदीवेळी हजारो लोकांशी पोलिसांचा संपर्क येत आहे. ड्यूटी करताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यादरम्यान अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूबाबतची माहिती, त्याचा प्रसार कसा होतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आज पालघर सुर्या कॉलनी येथील पोलीस मुख्यालयात पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, हॅंड सॅनिटायझर याचा योग्य वापर कशा प्रकारे करावा, हँड हायजीन पाळणे, ड्युटीवर असताना नागरिकांची चौकशी करताना सोशल डिस्टन्सिंग आणि घ्यावयाची काळजी, ड्यूटीवरून घरी गेल्यावर पोलिसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घरात कशा प्रकारे काळजी घ्यावी, कुटुंबीयांसोबतही अंतर पाळून राहावे, याबाबत covid-19 तालुका प्रमुख डॉ. तन्वीर यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.