ETV Bharat / state

कंटेनर व मिक्सरच्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू - Palghar latest update

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा येथे कंटेनर व मिक्सरच्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Jun 4, 2021, 2:18 PM IST

पालघर (वसई) - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा जवळील खाडी पुलावर मिक्सर व कंटेनर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. शुक्रवारी सकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. यात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

चालकाचा जागीच मृत्यू
चालकाचा जागीच मृत्यू

चालकाचा जागीच मृत्यू

वसई पूर्वेतील भागातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. मालजीपाडा येथील खाडी पुलाजवळील दुभाजकाच्या जवळून आरसीसी वाहतूक करणाऱ्या मिक्सरने अचानक वळण घेतल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक लागून अपघात झाला. यात चालक कॅबिनमध्ये अडकून दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हरीचंद्र रामनिवास यादव (वय, ४५) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. वालीवच्या बाफाणे पोलीस चौकीचे पोलीस, महामार्ग पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांना दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती बापाणे चौकीचे पोलीस रमेश शिंदे व संभाजी पालवे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण : बनावट ओळखपत्र वापरून आणखी एका कलाकाराने गपचूप घेतली लस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.