ETV Bharat / state

पालघरमध्ये मुसळधार : केळवे रोड स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांचा मदतीचा हात - इंदोर- कोच्चीवेली एक्सप्रेस

इतर स्थानकांत अडकलेल्या प्रवाशांचीही सुजाण नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत मदत केली. अडचणीच्या काळात लोकांनी पुढे येत केलेल्या या मदत व सहकार्यामुळे रेल्वे प्रवाशांनीही समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.

केळवे रोड स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी दिले जेवण
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:01 PM IST

पालघर - जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे विरारहुन पालघरच्या दिशेने येणारी तसेच मुबाईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेची वाहतूक ठप्प होती.

केळवे रोड स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी दिले जेवण

हेही वाचा- रेल्वे प्रवाशांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

यावेळी केळवे रोड स्थानकात अडकलेल्या इंदोर- कोच्चीवेली एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, हॉटेल निमा, हॉटेल गारवा, रूचिरा महिला बचतगट, युवक मित्र मंडळ केळवे यांनी केळवे रोड स्थानकात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोफत चहा, नाष्टा, पाणी व जेवणाची सोय केली.

हेही वाचा- देव तारी त्याला कोण मारी ! मालगाडीचे डबे अंगावरून गेले, तरीही त्या राहिल्या जीवंत

अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या पालघर, बोईसर, केळवे रोड स्थानकांवर तासंतास उभ्या होत्या. रेल्वे रूळांवर साचलेल्या पाण्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तासंतास रेल्वे स्थानकांत अडकून पडलेल्या या प्रवाशांचे हाल झाले.

Intro:मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात; केली प्रवाश्यांच्या जेवणाची सोयBody:मुसळधार पावसामुळे केळवे रोड रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात; केली प्रवाश्यांच्या जेवणाची सोय

नमित पाटील,

पालघरर दि. 4/8/2019 

     पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे विरारहुन पालघरच्या दिशेने येणारी तसेच मुबाईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेची वाहतूक ठप्प होती. अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या पालघर, बोईसर, केळवे रोड स्थानकांवर तासंतास उभ्या होत्या. रेल्वे रूळांवर साचलेल्या पाण्यामुळे  लांब पल्ल्यांच्या गाड्या पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तासंतास रेल्वे स्थानकांत अडकून पडलेल्या या प्रवाशांचे हाल झाले. आशा परिस्थितीत केळवे रोड स्थानकात अडकलेल्या इंदोर- कोच्चीवेली एक्सप्रेसमधील प्रवाश्यांच्या मदतीसाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, हाॅटेल निमा, हाॅटेल गारवा, रूचिरा महिला बचतगट, युवक मित्र मंडळ केळवे यांनी केळवे रोड स्थानकात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोफत चहा, नाष्टा, पाणी व जेवणाची सोय केली. तसेच इतर स्थानकांत अडकलेल्या प्रवाशांचीही सुजाण नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत मदत केली. अडचणीच्या काळात लोकांनी पुढे येत केलेल्या या मदत व सहकार्यामुळे रेल्वे प्रवाशांनीही समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.