पालघर - तृतीयपंथीयांना अंत्यविधीसाठी होणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायासाठी स्मशानभूमीसाठी ( Cemetery For Transgender Palghar ) जागा उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक पालघर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना ( Palghar District collector Order For Cemetery ) देण्यात आहे. तृतीयपंथीयांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी उपलब्ध होणार असल्याने तृतीयपंथीयांची अंत्यविधीसाठी होणाऱ्या त्रासातून सुटका होणार असून तृतीयपंथीयांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
अंत्यविधीसाठी करावा लागत होता अडचणींचा सामना -
तृतीयपंथीयांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी जिल्ह्यात उपलब्ध नव्हती. त्यांच्या सहकार्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना त्यांच्या अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. अंत्यविधी नेमका कुठे पार पाडायचे असा प्रश्न तृतीयपंथीयांच्या समोर उभा रहायचा. मग कुठेतरी गुपचूपपणे अंत्यविधी उरकावा लागत होता, अशी खंत तृतीयपंथी यांकडून वारंवार व्यक्त केली जात होती.
![Cemetery For Transgender Palghar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-mh-pal-01-cremationfacilityinpalgharfortransgendercommunity-mh10044_09022022113845_0902f_1644386925_711.jpg)
जिल्हा प्रशासनाने दिली जागा उपलब्ध करून -
तृतीयपंथीयांच्या अडचणी लक्षात घेता पालघर जिल्हा प्रशासनाने तृतीयपंथीयांना जिल्ह्यात स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध होणार असून अंत्यविधीसाठी होणाऱ्या त्रासातून सुटका झाल्याची भावना व समाधान तृतीयपंथीयांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - हिंगणघाट प्राध्यपिका जळीतकांड प्रकणातील आरोपीवरील हत्येचा गुन्हा सिद्ध; उद्या होणार शिक्षेची सुनावणी