ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई, विरारमध्ये नाताळ साधेपणाने साजरा - Palghar District Latest News

वसई, विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र यंदा नाताळच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसई, विरार परिसरातील चर्चकडून चर्चमध्ये येणाऱ्या नागरिकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. ख्रिस्ती बांधव देखील नियमांचे पालन करून, नाताळचा सण साजरा करताना दिसत आहेत.

Christmas Celebration 2020 Vasai
विरारमध्ये नाताळ साधेपणाने साजरा
author img

By

Published : Dec 25, 2020, 5:59 PM IST

पालघर/वसई - वसई, विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र यंदा नाताळच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसई, विरार परिसरातील चर्चकडून चर्चमध्ये येणाऱ्या नागरिकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. ख्रिस्ती बांधव देखील नियमांचे पालन करून, नाताळचा सण साजरा करताना दिसत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईतील ख्रिस्ती बांधव हा सण साधेपणाने साजरा करत आहेत. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी सर्व सण साधेपणानेच साजरा केले जात आहेत. नाताळ देखील अतिशय साधेपणाने आणि गर्दी न करता ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. यंदा प्रथमच ख्रिस्त जन्माची गीते असलेले कॅरल सिंगिंगचे कार्यक्रम देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. तसेच नाताळनिमित्ताने होणारे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई, विरारमध्ये नाताळ साधेपणाने साजरा

ख्रिस्ती बांधवांनी घरीच साजरा केला नाताळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये जाणे टाळले. अनेकांनी आपल्या घरीच राहूल नाताळ मोठ्या उत्साहात आपल्या कुटुंबींयासोबत साजरा केला. वसई, विरारमध्ये देखील अनेक ठिकाणी नाताळ घरीच साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरीच पार्टीचे आयोजन केले होते. पारंपरीक पद्धतीने मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला आहे. यााच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.