पालघर - येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्वेश येथे दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. यातील एक कार रस्त्यावरच उलटली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती.
हेही वाचा- 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'
या अपघातात पलटी झालेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. वर्दळीचा मार्ग असल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.