पालघर - ठाकरे सरकारने खुर्चीसाठी भगवा रंग सोडण्याचे पाप केले आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला. पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी गडचिंचले प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, साधू व त्यांच्या चालकाची हत्या होत असताना पोलीस बघ्यांची भूमिका घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अफवा असल्याचे सांगतात.
गृहमंत्री अन् मुख्यमंत्र्यांवर अविश्वास असेल तर गैर काय
साधू परिवारातील नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागणी केली आहे. हत्या झाली तर दाद मागण्याचा अधिकार आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास असेल तर गैर काय, असा सवाल सोमैया यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - सुखरूप पायथ्याशी पोहोचले तांदुळवाडी किल्ल्यावर वाट चुकलेले तीन पर्यटक
हेही वाचा - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भवानगडावर दीपोत्सव