पालघर - वसई-विरारला बिहार केले, असा टोला नाव न घेता राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडुंनी ठाकुरांना लगावला. विरारच्या मनवेल पाडा येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
वसई-विरार महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनांची सोडत देखील पार पडली आहे. याचवेळी प्रहार संघटनेने घेतलेल्या या मेळाव्याने येत्या काळात बहुजन विकास आघाडी पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.