पालघर - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार झाल आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नोव्हेल्टी हॉटेल जवळील ही घटना असून त्या या हल्ल्यातून बचावल्या आहेत.
सिद्धावा जायभाये या घरी जात असताना नोव्हेल्टी हॉटेल जवळील 'बर्गरकिंग'मध्ये जाण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. दरम्यान, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एका अज्ञात हल्लेखोरानी जायभाये यांच्यावर 1 राउंड फायर केला. दरम्यान, दुसरा राऊंड फायर करण्याच्या प्रयत्न असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याने हल्लेखोराला दगड फेकून मारला. यानंतर तो फरार झाला.
हेही वाचा - राज्यसभेविषयी खडसेंचे 'नो कमेंट्स'
हल्लेखोराने मास्क लावलेला होता, फुल्ल रेड ब्लॅक जाकीट घातलेले होते. अशी प्राथमिक माहिती मिळत असून हे हल्लेखोर नेमके कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा - राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची अयोध्येत घोषणा