ETV Bharat / state

डहाणू 'हिट अँड रन' प्रकरणी आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन - हिट अँड रन प्रकरण

डहाणू येथे भरधाव कारने नागरिकांना धडक देत हिट अँड रनची घटना शुक्रवारी (दि. 5) घडली होती. या प्रकरणातील आरोपी सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे अखेर निलंबित करण्यात आले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षकांनी ही निलंबनाची कारावई केली आहे.

f
f
author img

By

Published : Nov 7, 2021, 8:48 PM IST

पालघर -डहाणू येथे भरधाव कारने नागरिकांना धडक देत हिट अँड रनची घटना शुक्रवारी (दि. 5) घडली होती. या प्रकरणातील आरोपी सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे अखेर निलंबित करण्यात आले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षकांनी ही निलंबनाची कारावई केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या भरधाव कारने नागरिकांना दिली धडक

चिंचणी ते डहाणू प्रवासादरम्यान तारापूर मार्गावर एका भरधाव कारने शुक्रवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास धडक दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही कार चक्क तीन चाकांवर जवळपास 18 किलोमीटरपर्यंत भरधाव चालवत डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात थांबली. यानंतर कार चालक भिंतीवरून पळून गेल्याचे सांगितले जाते. ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या नावावर असून कारमध्ये पोलिसाची टोपीही आढळून आले. भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या एकाची प्रकृती ही अजूनही चिंताजनक असून त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

या संपूर्ण घटनेनंतर या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि.चे कलम 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आता पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आरोपी पोलीस अधिकाऱ्यवर कारवाई करत सुहास खरमाटे यांना निलंबित केले आहे.

हे ही वाचा - विवाहित महिलेची निर्घृण हत्या; पालघरच्या खारेकुरण येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.