पालघर - जिल्ह्यातील डहाणू-तलासरी परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. आज सकाळी 9 वाजून 17 मिनीटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डहाणू-तलासरी परिसरात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. वारंवार बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही ही मोठी दुर्घटना आजवर झालेली नाही. मात्र, वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनामार्फत आजवर या भागात कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, अशी तक्रार स्थानिक रहिवासी करत आहेत.