ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन पुलांना मंजूरी, मच्छीमारांना होईल फायदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरार जवळील नारंगी ते टेंभीखोडावे आणि सातपाटी ते मुरबा या दोन पुलांना नुकतीच एमएमआरडीए तर्फे मंजुरी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

author img

By

Published : Oct 20, 2022, 3:32 PM IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन पुलांना मंजूरी

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (Mumbai Ahmedabad highway) वर वाहन चालकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेतला असून विरार जवळील नारंगी ते टेंभीखोडावे आणि सातपाटी ते मुरबा या दोन पुलांना नुकतीच एमएमआरडीए तर्फे मंजुरी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. (bridges on Mumbai Ahmedabad highway). पुलासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या किनारपट्टीवरील मच्छीमार, बागायतदार तसेच तारापूर एमआयडीसीतील उद्योजक यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या भागात दिली आहे पुलांना मंजूरी
या भागात दिली आहे पुलांना मंजूरी

आणखी काही पुलांची मागणी: देशातील एक महत्त्वाचे अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यात तारापूर येथे असून त्याच्या जवळच भाभा अनुसंशोधन केंद्र आणि नव्याने उभारण्यात आलेला आशिया खंडातील सर्वात मोठे असे पाचशे मेगावॅटचे दोन अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत. या प्रकल्पात एखादी घटना घडल्यास किनारपट्टीवरील नागरिकांना तातडीने हलवण्याच्या दृष्टीने या दोन पूलांबरोबरच नवापूर दांडी येथेही पूल उभारण्याची गरज आहे, त्यामुळे राज्य शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करून या ठिकाणी देखील पूल उभारावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होत असलेली कोंडी टाळण्याच्या दृष्टीने गेले अनेक वर्ष सागरी महामार्गाची मागणी पालघर जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. याबाबत पाच वर्षांपूर्वी शासनाकडून दातिवरे ते अर्नाळा अथवा नारंगी खाडीवर पूल उभारून संपूर्ण किनारपट्टी मुंबईला जोडली जावी, अशी अपेक्षा नागरिक करीत होते.

या भागात दिली आहे पुलांना मंजूरी
या भागात दिली आहे पुलांना मंजूरी

मुंबईचे अंतर होईल कमी: पालघर जिल्ह्यातील मच्छिमार, भंडारी शेतकरी, बागायतदार, डाय मेकिंग त्याचबरोबर पर्यटन व्यवसायिक यांच्यासाठी हा पूल फार गरजेचा आहे. या भागातील जवळपास दीडशेहून अधिक गावांन या पुलाचा लाभ मिळणार असून येथील सर्व व्यवसाय व त्यातून उत्पन्न होणार कच्चा व पक्का माल मुंबईला अवघ्या काही वेळेत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे त्या भागातील नागरिक व व्यावसायिक स्वागत करत आहेत. जिल्ह्यातील पालघर तालुक्यातल्या नवापूर व दांडी या खाडीवरील पुलाची मागणी मात्र शासनाने अजूनही पूर्ण केली नसल्याने ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा येथील मच्छिमार करत आहेत.

या भागात दिली आहे पुलांना मंजूरी
या भागात दिली आहे पुलांना मंजूरी

निर्णयावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया:

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी वर्गास प्रवासादरम्यान तीन ते चार तास लागतात ती वेळ वाचणार आहे. तसेच या भागातील शेतकरी, मच्छीमार व उद्योजकांना मुंबईला आपला माल लवकर पोहोचवण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. पालघर जिल्ह्यातील भाजीपाला मासळी मुंबईला वेळेत पोहोचल्याने त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल त्याचप्रमाणे या भागातील पर्यटन व्यवसाय वाढीला सुद्धा चालना मिळेल. - वेलजी गोगरी, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

या पुलामुळे दळणवळण जलद गतीने होईल. हा पूल करताना मच्छीमारांचा विचार करून पूलाची उंची सुद्धा योग्य ठेवली पाहिजे, जेणेकरून मच्छीमार बोटीना त्याचा त्रास होणार नाही. हा पुल झाल्याने रोजगारांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मासे मुंबईला पोहोचवणे सुलभ होणार असल्याने मच्छीमारांसाठी ही फायदेशीर बाब ठरणार आहे. - जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मच्छीमार सहकारी संघ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात समुद्र खाडीवर दोन पूल उभारण्याचे प्रस्ताव जाहीर केले असून त्याचे स्वागत आहे. या पुला मूळे पर्यटन व्यवसायाला बरकत होणार असून मुंबईचे अंतर कमी होणार असल्याने पर्यटकांची सोय होऊन ते आणखी या जिल्ह्याकडे आकर्षित होतील. - आशिष पाटील, केळवे बीच पर्यटन उद्योग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.