पालघर (वाडा) - वाडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात १० ग्रामपंचायतीच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
वाडा तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा सात सदस्य आणि सरपंचाची जनतेतून थेट निवड अशा जागांकरीता येथे सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याचबरोबर कळाल - २, देवळी - १, कासघर- २, आखाडा, हमरापूर- १, खुपरी - १, तुसे २, गोराड- १, बुधावली - १ आणि आब्जे - 3 अशा एकुण १६ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता सुट्टीचा दिवस वगळून दिनांक ३१ मे २०१९ ते ६ जुन २०१९ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत राहील.
अर्जाची छाननी ७ जुन २०१९ रोजी छाननी संपादनपर्यंत राहील. हरकती घेण्याचा दिनांक १० जुन २०१९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. मतदानाचा दिनांक २३ जुन २०१९ ला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. तर मतमोजणी २४ जुन २०१९ आहे.
अर्ज दाखल करण्याचा दिनांक - ३१ मे २०१९ ते ६ जुन २०१९
अर्जाची छाननी - ७ जुन २०१९
हरकती घेण्याचा दिनांक - १० जुन २०१९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
मतदानाचा दिनांक - २३ जुन २०१९ ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी - २४ जुन २०१९