ETV Bharat / state

भरउन्हात पायी जाणाऱ्या मजुरांसाठी पत्रकार ठरले देवदूत; झाली एसटीतून मध्यप्रदेशकडे जाण्याची 'सोय' - पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप कसबे

शुक्रवारी भरउन्हात चालत मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. याबाबत पत्रकारांना माहिती मिळताच ही बाब त्यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप कसबे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तहसीलदारांना घटनेची माहिती दिल्यानंतर या मजुरांना बसची व्यवस्था करुन देण्यात आली.

work
मध्यप्रदेशकडे निघालेले मजूर
author img

By

Published : May 16, 2020, 8:36 PM IST

पालघर - बोईसर येथील पास्थळ कमलुवाडी या भागात राहणारे ४६ मजूर व लहान मुले शुक्रवारी भरउन्हात चालत मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. याबाबत पत्रकारांना माहिती मिळताच ही बाब त्यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप कसबे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रदिप कसबे यांनी तहसीलदार सुनिल शिंदे यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनी या मजुरांना एसटी बसची व्यवस्था करुन दिली.

पत्रकारांनी तहसीलदार यांना सर्व कामगारांची माहिती आधार कार्ड नंबरसह देवून तातडीने ४६ कामगारांना महाराष्ट्राच्या शिरपूर सिमेपर्यंत सोडण्यासाठी परवानगी मिळवली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचे नियोजन केले. शुक्रवारी रात्री उशिरा आगार व्यवस्थापक संदीप शिंदे यांनी पालघरहून परवानगी पत्र आणून सर्व मजुरांना मध्यप्रदेश सीमेवरपर्यंत बस सोडण्यात आल्या. यावेळी मजुरांनी आनंद व्यक्त करत पत्रकार व प्रशासनाचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.