पालघर - वसई पूर्व महामार्गावरील तानसा नदीवरील खराटतारा पुलावरून मालवाहतूक कंटेनर थेट नदी पात्रात कोसळला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास (२८ ऑगस्ट) घडली. ब्रेक फेल होऊन वाहन अनियंत्रित झाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहन चालक बचावला आहे.
कंटेनर २० ते २५ फूट खोल नदीपात्रात कोसळला. वाहनचालकाने केबिनमधील खिडकीतून उडी टाकून किनारा गाठला व आपले प्राण वाचविले. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे. संतोष कुमार यादव (३५) असे त्याचे नाव असून केवळ पोहता येत होते म्हणून माझे प्राण वाचले असे त्याने सांगितले. या अपघाताची तीव्रता व नदीच्या प्रवाहाची गती पाहता मोठी हानी झाली नाही.
हेही वाचा- ३ वर्षीय मुलीचा गॅरेजमधील रॅम्पच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू