ETV Bharat / state

पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाचे ८८ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू, ११९ कोरोनामुक्त - Palghar latest news

गेल्या चोवीस तासांत ८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

88 patients tested positive
88 patients tested positive
author img

By

Published : Jul 31, 2020, 12:38 PM IST

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ८८ कोरोना रुग्णांपैकी ३६ रुग्ण पालघर तालुक्यातील असून २९ डहाणू तालुक्यातील, ११ वाडा तालुक्यातील, ३ तलासरी तालुक्यातील, ५ विक्रमगड तालुक्यातील व ४ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. बुधवार ते गुरुवारी या 24 तासांत ग्रामीण भागात ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दोन मृत रुग्ण पालघर तालुक्यातील व एक डहाणू तालुक्यातील आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार १७१ इतकी झाली असून, ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ४३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.