ETV Bharat / state

Palghar Railway Police : बोईसर रेल्वेस्थानकावर आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण; अपहरणकर्त्याला घेतले ताब्यात - बोईसर रेल्वेस्थानकावर आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण

बोईसर रेल्वे स्थानकावरून एका रेल्वे मजूर दाम्पत्याच्या आठ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. पालघर लोहमार्ग पोलिसांनी ( Palghar Railway Police ) अवघ्या आठ तासात अपहरणकर्ता पकडून त्याच्याकडून चिमुकलीची सुटका ( girl kidnapped accused arrest palghar railway police ) केली. चिमुकलीला सुखरूप असून तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले.

Palghar Railway Police
अपहरण झालेल्या मुलीची सुटका
author img

By

Published : May 7, 2022, 2:00 PM IST

Updated : May 7, 2022, 3:45 PM IST

पालघर - बोईसर रेल्वे स्थानकावरून एका रेल्वे मजूर दाम्पत्याच्या आठ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. पालघर लोहमार्ग पोलिसांनी ( Palghar Railway Police ) अवघ्या आठ तासात अपहरणकर्ता पकडून त्याच्याकडून चिमुकलीची सुटका ( girl kidnapped accused arrest palghar railway police ) केली. चिमुकलीला सुखरूप असून तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले.

रेल्वेरूळा शेजारी झोळीत झोपली असताना चिमुकलीचे अपहरण - वर्षा व तिचा पती कन्हैया दोघेही रेल्वे रुळावर काम करत असल्याने त्यांनी आपल्या आठ महिन्याच्या मुलीला बोईसर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाखाली दोन क्रमांकाच्या फलाटावर महिमा हिला झोळीत झोपवून कामावर निघून गेले. 11.30 च्या दरम्यान तिचे अपहरण झाले. ती झोळीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी महिलेने ही घटना वर्षकडे सांगितली. वर्षा झोळीकडे आल्यानंतर तिने आपले बाळ अपहरण झाल्याने टाहो फोडला.

रेल्वे पोलिस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

पालघर लोहमार्ग पोलिसांनी 8 तासांत अपहरणकर्त्याला केली अटक - मुलीचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच डामोर दांपत्याने बोईसर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून बाळ पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही तत्परता दाखवून अज्ञाताने चिमुकलीचे अपहरण केल्याचा गुन्हा तातडीने दाखल केला. पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीने आपली तपास चक्रे फिरवली. त्यानुसार त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. रेल्वे स्थानकाकडे कामासाठी येत असलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक इसम बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर इसमाकडील बाळाचा फोटो काढला व पोलीस ठाण्यात पाठवला. त्यानंतर हा फोटो त्या बाळाच्या आईला दाखवल्यानंतर हे बाळ आपलेच असल्याचे या महिलेनी ओळखले. लोहमार्ग पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीला अटक केली. अवघ्या आठ तासात ही कारवाई करत लोहमार्ग पोलिसांनी आठ महिन्यांच्या चिमुकलीचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे दिला.

हेही वाचा -Nashik Fire News : नाशिक विमानतळाच्या धावपट्टी जवळ अग्नितांडव, 50 एकर क्षेत्रावरील वृक्ष जळून खाक

Last Updated : May 7, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.