पालघर- वसई-विरारमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. वसई तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 878वर पोहोचली आहे.
कोरोना आजारावर उपचार घेत असताना विरार पूर्व येथील 78 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. तर वसई विरारची मृत्यू संख्या 29 पोहोचली आहे.
आज 7 रूग्ण बरे झाले आहेत. वसई विरारमधील एकूण रुग्ण संख्या 878 ऐवढी झाली असून आतापर्यंत 29 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना आजाराने बरे झालेले रुग्ण 355 घरात आहेत. तर दुसऱ्या बाजूला 494 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.