वसई-विरार (पालघर) - वसई विरार शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजारांच्या पार गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच शहरात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहेत. तसेच गुरूवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 260 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरूवारी दिवसभरात उपचारादरम्यान 8 रुग्णाचा मृत्यू झाला, तर 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार 870 एवढी झाली असून वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 453 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 20 हजार 403 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 14 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.