ETV Bharat / state

रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. स्कूटीचे ६० हजारांचे कर्ज फेडता न आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/05-September-2021/12974936_662_12974936_1630826935398.png
रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या
author img

By

Published : Sep 5, 2021, 1:13 PM IST

ठाणे - नालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय तरुणाने कर्जावर घेतलेल्या स्कूटीचे हफ्ते भरता न आल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बाबुराव सकपाळ असं या तरुणाचे नाव आहे. राहुलची आई गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. तर त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे नालासोपाऱ्याच्या तुळींज परिसरात तो एकटा राहात होता.

राहुल हा नाटकात छोटी मोठी कामे करत होता. तसेच वर्तमानपत्र विक्रीसाठी कुपन स्कीमच काम करत होता. त्याने स्कुटी घेण्यासाठी 60 हजारांचे कर्ज काढले होते. मात्र, कोरोनामुळे आलेली बेरोजगारीने त्याच्या स्कुटीचे हफ्ते थकले होते. त्याला बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी त्याने मित्राकडूनही पैसे घेतले होते. मात्र, त्याची फेड करता येत नसल्याने नैराश्यात जाऊन राहुलने शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले.

सर्व हकीकत एका सुसाईट नोटमध्ये लिहली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला आहे. या घटनेची तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.