ETV Bharat / state

पालघरमध्ये १२ हजार रुपयासाठी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; दोघांना अटक - Nilesh Rawal murder 2 arrested Palghar

तलासरी येथील कुर्झे धरणात काही दिवसांपूर्वी निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल (वय २९) या व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. अवघ्या 12 हजार रुपयासाठी या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

Nilesh Rawal murder Palghar
निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल
author img

By

Published : Nov 23, 2020, 8:38 PM IST

पालघर - तलासरी येथील कुर्झे धरणात काही दिवसांपूर्वी निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल (वय २९) या व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. अवघ्या 12 हजार रुपयासाठी या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

माहिती देताना पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे

हत्या करून धरणात फेकण्यात आला मृतदेह -

निलेश उर्फ दिनेश चुनिलाल रावल हे गुजरात मधील उंबरगाव येथील होलसेल तेलाचे व्यापारी आहे. ते उद्धवा आणि तलासरी शहरात येऊन किराणा दुकानदारांकडे तेलाचे ऑर्डर बुक करत असत, तसेच शेवटच्या थकबाकीच्या ऑर्डरची देयके घेण्यासाठी येत असत. 3 नोव्हेंबर रोजी ऑर्डर घेण्यासाठी आलेले निलेश रावल हे घरी परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी 4 नोव्हेंबर रोजी मुलगा हरवल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 8 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास तलासरी येथील कुर्झे धरणात एक मृतदेह तरंगताना गावकऱ्यांना आढळून आला होता. त्यानंतर चौकशी केली असता मृतदेह निलेश उर्फ दिनेश चुनिलाला रावल यांचा असल्याचे उघड झाले होते.

12 हजार रुपयांसाठी करण्यात आली हत्या -

कुर्झे धरणात आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. नीलेश रावल हे त्यांच्या वडिलांचे उधारीचे पैसे घेण्यासाठी तलासरीत आले असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्या जवळील 12 हजार रुपये घेतले व त्यांची निर्घृण हत्या केली. मृतदेह सापडू नये म्हणून त्यास दगडाला बांधून तलासरी येथील कुर्झे धरणात फेकून देण्यात आले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पालघर स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात कलम 302, 201, 364, 43 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - पश्चिम-रेल्वेच्या भाईंदर खाडीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हातोडा; पाणजूवासीयांची व्यथा कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.