ETV Bharat / state

डहाणू तालुक्यात 18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू..

माटगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते. कीटकनाशके फवारण्यात आलेला भाजीपाला खाल्ल्यामुळे ही जनावरे मरण पावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय, जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून एखाद्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक विषप्रयोग करून जनावरांची हत्या केल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.

cow
18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:42 PM IST

पालघर - डहाणू तालुक्यातील माटगाव परिसरात 18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू

जनावरांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाणगाव पोलीस आणि डहाणू पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. माटगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते. कीटकनाशके फवारण्यात आलेला भाजीपाला खाल्ल्यामुळे ही जनावरे मरण पावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय, जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून एखाद्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक विषप्रयोग करून जनावरांची हत्या केल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेश : गौशाळेमध्ये 100 गायी आढळल्या मृत अवस्थेत, विषबाधा झाल्याचा संशय

दरम्यान, शेतकऱ्यांनी काही दिवस आपल्या जनावरांना चरायला न सोडता त्यांना गोठ्यातच चारा देण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी दिला आहे. तसेच, जनावरांची प्रकृती बिघडल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Intro:डहाणू तालुक्यातील माटगाव येथे 18 गायी, 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू;  मृत्यूचे कारण अस्पष्ट   Body:    डहाणू तालुक्यातील माटगाव येथे 18 गायी, 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू;  मृत्यूचे कारण अस्पष्ट   

नमित पाटील,
पालघर,दि.27/11/2019

   पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वानगाव नजीक असलेल्या माटगाव परिसरात 18 गायी व 2 बैल मृतावस्थेत आढळले आहेत. मात्र गायी व बैलांच्या  या  संशयास्पद  मृत्यूचे कारण हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल असे पोलिस प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.

     पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वानगाव नजीक असलेल्या माटगाव शेतात, झाडाझुडपात तसेच खुल्या जागेत 19 गायी व 2 बैल मृतावस्थेत आढळले आहेत आहेत. गुरांच्या या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहेे. घटनेची मिळताच वाणगाव पोलिस घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले.  

     माटगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती असून भाजीपाला व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारली करतात, हा भाजीपाला गुरांनी खाल्यानंतर या गुरांचा मृत्यू झाला असळण्याचीही शक्यता आहे. रात्रीच्यावेळी मोकाट गायी जनावरांचा तांडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात  असेच बागायती शिरून त्यातील पिक, भाजीपाला फस्त करतात. जनावरांमुळे होणाऱ्या या नुकसानाला कंटाळून एखाद्या शेतकरी अथवा बागायतदारांने भाजीपाल्यात थायमेट किंवा इतर कीटकनाशक वापरून त्यांना मारले असण्याचीही शक्यता आहे. 

     गायींच्या या संशयास्पद मृत्यूबाबत वणगाव पोलीस तपास करीत असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत गायीच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच गाईंच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

Byte:-
डॉ. राहुल संखे- पशुवयद्यकीय अधिकारी, डहाणू

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.