पालघर - वसईमध्ये 12 वर्षीय मुलाचा पापडी तलावात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. आई-वडिलांसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेला असताना हा मुलगा तलावात पडला. कृणाल गुप्ता, असे या मृत मुलाचे नाव आहे.
हेही वाचा - गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले चार जण पूर्णा नदीत गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला
याबाबत अधिक माहिती अशी की, कृणाल गुप्ता हा पापडी येथील बौद्धवाडीमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. शनिवारी दुपारी तो त्यांच्यासोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
हेही वाचा - राजस्थानात एकाच कुटुंबातील तिघींचा नदीत बुडून मृत्यू
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती वसई-विरार अग्निशमन दल व वसई पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कृणालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कृणालचा मृतदेह सापडला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.