पालघर - सोमटा गावातील नारायण सुर्वे यांच्या राहत्या घरात अजगर आढळून आल्याने तारांबळ उडाली होती. सर्पमित्रांनी या 12 फूट लांबीच्या अजगराला पकडून त्याला जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
पालघर तालुक्यातील मनोर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सोमटा गावात राहणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या घरात एक अजगर शिरला. आत दर्शन घरात शिरल्याचे लक्षात येताच सुर्वे यांनी तात्काळ सर्पमित्र व वन अधिकाऱ्यांना पाचारण केले. सर्पमित्र महेंद्र गोवारी, बिलाल अवारी यांनी घटनास्थळी दाखल होत या महाकाय अजगराला पकडले. 12 फूट लांबी व 24 किलो वजन असलेल्या या अजगराला सर्पमित्र व वनक्षेत्रपाल यांनी जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
पावसाळा असल्याने साप, अजगर यांसारखे सरपटणारे जीव आपला अधिवास सोडून भक्ष व निवाराच्या शोधात अनावधानाने मानवी वस्तीत शिरतात. त्यांना न मारता सर्पमित्र किंवा वन विभाग विभागाची यांना कळवून त्यांची मदत द्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
पालघर : सोमटा गावात आढळला 12 फुटांचा अजगर; सर्पमित्रांनी सोडले सुरक्षितस्थळी - पालघर अजगर बातमी
पालघर येथील सोमटा गावातील एका घरात तब्बल 12 फूट लांबीच्या अजगर आढळला. त्याला सर्पमित्रांनी पकडून जंगलात सुरक्षित स्थळी सोडले.