पालघर - जिल्ह्यातील पाली-विक्रमगड रस्त्यावरील वाकडुपाडा जवळ बस व कंटेनरचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 7 वाजता झाला असून यात 11 प्रवासी जखमी झाले आहेत.
राज्य महामंडळ विभागाची वाडा-जव्हार बस (एम एच 14 बीटी 4573) वाकडुपाडा जवळ आली असता समोरून येणाऱ्या कंटेनरला (एम एच 04 जी एफ 3974) धडकली यात 11 प्रवासी जखमी झाले असून 6 जखमींवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.