पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळलेल्या 10 रुग्णांमध्ये 6 महिला व 4 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 391 झाली असून, 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 270 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.