उस्मानाबाद - शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे तरुण आहेत आणि त्यांनी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून वेगवेगळे उपक्रम राबवून स्वतःला सिद्ध केले आहे. ते 'आयत्या पिठावर रेघोट्या' ओढण्याचे काम करत नाहीत, असे म्हणत घराणेशाहीचा मुद्दा मांडत उस्मानाबादच्या तरूणांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवली तर ते ठाकरे कुटुंबातील एकमेव व्यक्ती असतील ज्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा या तरूणांनी व्यक्त केली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या मनात काय आहे, हे येणार काळच सांगेल. मात्र, तरुणांच्या मनात आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशीच इच्छा आहे.