ETV Bharat / state

Young Boy Drowned In Water : पाणी पाजण्यासाठी गेल्यावर म्हशीने ओढल्यामुळे वाहून गेला मुलगा

author img

By

Published : Oct 22, 2022, 1:14 PM IST

Updated : Oct 22, 2022, 1:20 PM IST

म्हशीला पाणी पाजत असताना म्हशीने ओढल्यामुळे ढगपिंपरी येथील १६ वर्षीय मुलगा ओम बालाजी गरड हा नदीच्या पूरात (Young Boy drowned in water) वाहून गेला. यामध्ये ओमचा मृत्यू (Young boy dead in flood water) झाला. ही घटना गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी घडली. (Latest news from Osmanabad)

Young Boy Drowned In Water
Young Boy Drowned In Water

उस्मानाबाद : म्हशीला पाणी पाजत असताना म्हशीने ओढल्यामुळे ढगपिंपरी येथील १६ वर्षीय मुलगा ओम बालाजी गरड हा नदीच्या पूरात (Young Boy drowned in water) वाहून गेला. यामध्ये ओमचा मृत्यू (Young boy dead in flood water) झाला. ही घटना गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी घडली. (Latest news from Osmanabad)

उल्फा नदीच्या पात्रात आढळले शव- ओमचे प्रेत १८ तासानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि २१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अवारपिंपरी शिवारातील उल्फा नदीच्या पात्रातून काढण्यात आले. ओम नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला व परंडा पोलीस ठाणे व तहसिलदार यांना घटनेची माहिती दिली. महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने या घटनेची माहिती उस्मानाबाद येथील NDRF च्या पथकाला देण्यात आली होती; मात्र पथक ओमच्या शोध कार्यासाठी घटनेच्या दुसऱ्या दिवशी दाखल झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पूराच्या पाण्यातून मृतदेह काढला- पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. विशाल खोसे, पो.कॉ. अमोल वाघमारे यांच्या सह तलाठी गुळमीरे, ढगपिंपरीचे पोलिस पाटील हरिदास हावळे यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थांनी ओमचे शोध कार्य सुरू केले; मात्र ओमचा मृतदेह सापडत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी देवगाव परिसरातील नदी पात्रातून ओमचे प्रेत वाहून जात असल्याची माहिती आवारपिपरी येथील आदित्य नरूटे व सुधिर चौधरी या तरुणाला कळताच दोघांनी अवारपिपरी शिवारातील नदीकडे धाव घेतली व लक्ष देत नदीकाठी थांबले. काही वेळातच त्यांना प्रेत नदीच्या पुरात वाहून येत असताना दिसले. आदित्य नरूटे याने मोठ्या धाडसाने काठोकाठ वाहत्या नदीत उडी मारून सुधीर चौधरी यांच्या मदतीने ओमचे प्रेत बाहेर काढले.

घटनेमुळे गावात हळहळ- प्रेत सापडल्याची माहिती आदित्य नरूटे व सुधिर चौधरी यांनी नातेवाईक व प्रशासनाला दिल्याने पोना खोसे, पोकॉ वाघमारे, तलाठी गुळमीरे यांनी तात्काळ घटना स्थळी दाखल झाले व पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Oct 22, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.