ETV Bharat / state

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला कुळव..

मान्सून आल्यानंतर पहिल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. मात्र नंतर पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातुन गेले. आजही बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. मात्र, ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांच्यावरती ह्या उगवलेल्या पिकांवर खर्च करून कुळव फिरवण्याची वेळ आली आहे.

कुळव
author img

By

Published : Jul 24, 2019, 2:34 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्याने दुष्काळाचा उंबरठा ओलांडला असून यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग संकटात सापडला असून बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकणाऱ्या पिकांवर कुळव फिरवण्याची वेळ आल्याचे दृष्य आहे.

शेतीची व्यथा सांगताना शेतकरी

जिल्ह्यातील रुईभर गावातील शेतकरी किशोर कोळगे यांनी आपल्या सहा एकर सोयाबीनमध्ये कुळव घातला आहे. मान्सून आल्यानंतर पहिल्या जेमतेम पावसावर या शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडस केले. त्यानंतर पावसाने उघडीप दिली तो अजूनही म्हणावा तसा बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक हातातून गेले आहे. आजही बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. मात्र, ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांच्यावरती ह्या उगवलेल्या पिकांवर खर्च करून कुळव फिरवण्याची वेळ आली आहे.

पाऊस नसल्याने खरिपाचे पीक हातातून निघुन गेले, त्यामुळे निदान रब्बीसाठी तरी या रानाचा उपयोग होईल म्हणून त्यात कुळव चालवून लावलेले पीक बाजूला काढण्यात येत आहे. शेतात एकरी ५ ते ६ हजार रुपये खर्च करून खरिपाची पेरणी करण्यात आली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने हाती कुठलेही उत्पन्न न घेता यात आणखी खर्चाची भर घालून या उगवलेल्या पिकाला शेतातून बाजूला काढले जात असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

Intro:शेतकऱ्यांने उभ्या पिकावर ती फिरवला कुळव..

उस्मानाबाद- जिल्ह्याने दुष्काळाचा उंबरठा ओलांडला आहे यावर्षी अल्प पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असून बहुतांश शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणी वरती आज कुळव फिरवण्याची वेळ आलेली आहे जिल्ह्यातील रुईभर गावातील शेतकरी किशोर कोळगे यांनी आपल्या सहा एकर सोयाबीन मध्ये कुळव घातला आहे मान्सून आल्यानंतर पहिल्या जेमतेम पावसावरती या शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडस केले त्यानंतर पावसाने उघडीप दिली तो अजूनही म्हणावा तसा बरसला नाही त्यामुळे खरिपाचे पीक हातातून गेले आहे आजही बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत मात्र ज्यांच्या पेरण्या झाल्यात त्यांच्यावरती ह्या उगवलेल्या पिकावर ती खर्च करून कुळवण्याची वेळ आली आहे खरिपाचे पीक तर हातातून गेलेच आहे पण आता रान नीट करुन रब्बीसाठी तरी या रानाचा उपयोग होईल म्हणून पीक शेतातून बाजूला काढण्यात येत आहे, एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्च करून खरिपाची पेरणी केली मात्र हाती कुठलेही उत्पन्न न घेता यात आणखी खर्च ची भर घालून या उगवलेल्या पिकाला शेतातून बाजूला काढले जात आहेBody:यात vis आणि byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.