ETV Bharat / state

वारीस पठाण मूर्ख, प्रविण दरेकरांची टीका

वारीस पठाण हे मुर्खासारखे बेताल वक्तव्य करतात. आशा प्रकारचे वक्तव्य करून तरुणांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे हे योग्य नाही. तसेच उद्या जर या ठिकाणी देशातल्या जनतेचे हात उचलले गेले तर वारीस पठाणला ते भारी पडेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

pravin darekar latest comment
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Feb 22, 2020, 8:02 AM IST

उस्मानाबाद - वारीस पठाण हे मुर्ख आहेत. ते मुर्खासारखे बेताल वक्तव्य करत आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. वारीस पठाण यांनी गुलबर्गा येथे भडकावू भाषण केले होते. या भाषणाचा समाचार घेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वारीस पठाण यांच्यावर ही टीका केली.

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

दरेकर हे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबादला आले होते. ते पुढे बोलताना ते म्हणाले, की वारीस पठाण हे मुर्खासारखे बेताल वक्तव्य करतात. आशा प्रकारचे वक्तव्य करून तरुणांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे हे योग्य नाही. उद्या जर या ठिकाणी देशातल्या जनतेचे हात उचलले गेले तर वारीस पठाणला ते भारी पडेल, असा इशारा दरेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील टीका केली. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यात काय केले, हा प्रश्न करत आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला ही सरकार काहीच देऊ शकली नाही. उलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जे काम केले त्याच कामांना स्थगिती देण्याचे काम सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर, विकास कामांपासून दूर पळण्यासाठी वेगवेगळ्या चौकशी करण्याचा फार्स राज्य सरकारकडून सुरू असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

हेही वाचा- अनैतिक संबंधात अडसर.! प्रियकराच्या साथीने पत्नीने केली अंध पतीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.