ETV Bharat / state

उस्मानाबादेत वडापाव व्यावसायिकाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले जीवन

शहरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित प्रकरणाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

suicides in osmanabad
शहरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
author img

By

Published : Aug 7, 2020, 4:49 PM IST

उस्मानाबाद - शहरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित प्रकरणाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

गणपती बंडगर असे या वडापाव व्यावसायिकाचे नाव असून ते घाटंग्री येथे येथील रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून ते उस्मानाबाद शहरात बार्शी बायपास रस्त्यावर वडापाव विक्रीचा छोटासा व्यवसाय चालवतात. मात्र गेली काही दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गणपत बांडगर परिवाराला घेऊन घाटंग्री येथे त्यांच्या मूळ गावी राहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांची अडीच एकर जमीन आहे. याच ठिकाणी त्यांनी धोतराचा वापर करून झाडाला गळफास घेतला.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अद्याप गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.