उस्मानाबाद - जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बुधवारी चाकू हल्ला झाला होता. विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते कळंब तालुक्यातील नायगाव पडूळी येथे आले होते. त्यावेळी अजिंक्य टेकाळे या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आज अजिंक्य टेकाळे याने स्वतः हून कबुली दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ओमराजे यांनी लोकांचे संसार बुडवल्याचा आरोप त्याने व्हिडिओत केला आहे.
हेही वाचा - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
खासदार ओमराजे यांनी कारखाना बंद पाडला, हजारो लोकांना बेघर केले, तसेच बेरोजगारी वाढवली, असे आरोप या हल्लेखोराने व्हिडिओमध्ये केला आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याच्या मनात खासदार ओमराजे यांच्याविषयी रोष निर्माण झाला आणि त्याने हा हल्ला केल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर भाजपच्या प्रेमापोटी मला ओमराजे यांचा राग येत होता, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशीही मागणी त्याने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा - 'या' मंत्र्यांना निवडणूक जाणार अवघड? तर, काही नेतेही अडचणीत?