ETV Bharat / state

'त्या' आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याप्रमाणे पवनराजे यांच्या हत्येप्रकरणी ओमराजेंना न्याय मिळावा - उद्धव ठाकरे - sharad Pawar

महाराष्ट्राच्या हितासाठी मी हा युतीचा निर्णय घेतला.  त्यामुळे शरद पवार यांच्या पोटात गोळा येत असल्याची  त्यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 15, 2019, 2:44 AM IST

Updated : Apr 15, 2019, 7:49 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पलटवार केला आहे. ढवळे यांना जो न्याय मिळायला हवा तो न्याय पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ओमराजेंना न्याय मिळावा, अशी त्यांनी मागणी केली. युतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त घेण्यात आलेल्या शहरातील प्रचारसभेत ते बोलत होते. ढवळे व इतर शेतकऱ्यांची मातोश्री येथे भेट झाली नसल्याबद्दल ठाकरेंनी सभेत जाहीर माफीही मागितली.

उद्धव ठाकरे

दोन दिवसांपूर्वी दिलीप ढवळे यांनी शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्या केली होती. शेतकरी दिलीप ढवळे यांनी चिठ्ठीत उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याची खंतही व्यक्त केली होती. हा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही माझी आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची इच्छा आहे.

युती केल्याने शरद पवारांच्या पोटात गोळा येतो- उद्धव ठाकरे
मी शब्द फिरवले असल्याची टीका शरद पवार वारंवार करत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी मी हा युतीचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्या पोटात गोळा येत असल्याची त्यांनी टीका केली. राज्यघटनेतील देशद्रोहाचे कलम रद्द करणे, शरद पवार यांना मान्य आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार हे महाराष्ट्राबरोबर निष्ठेने राहिले नाहीत. तसे राहिले असते तर महाराष्ट्राने शरद पवारांना डोक्यावर घेतले असते, असा टोला त्यांना लगावला.

उद्धव ठाकरे राहुल गांधींना म्हणाले नालायक कार्ट-
काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांची नक्कल करत त्यांच्या माफिनामाचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर नालायक कार्ट अशी टीका केली. असा व्यक्ती देशाचा पंतप्रधान नको, असे त्यांनी मत व्यक्त केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा मुद्दा का नाही, असा त्यांनी सवाल केला. आम्ही राममंदिर बांधण्यावर ठाम असून याच विषयावर भाजपबरोबर युती केल्याचे त्यांनी सांगितले. सभेत लोकसभा उमेदवारीचे तिकीट कापल्याने नाराज असलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे उपस्थित होते. गायकवाड यांना काळजी करण्याची गरज नाही. या पुढची जबाबदारी माझी आहे, असा विश्‍वास त्यांनी गायकवाड यांना यावेळी दिला.

काय आहे पवनराजे निंबाळकर खून प्रकरण-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर त्यांचे भाऊ पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचा आरोप होता. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह हे महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येवरून राष्ट्रवादीने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

याचे feed mojo वरती आहे आणि ते या नावाने आहे
14_apr_mh_25_osmanabad_uddhav_thakare

जो न्याय ढवळे यांना द्यायला हवा तोच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ओमराजे यांना ही मिळायला हवा ठाकरे यांचा पलटवार

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कसबे ताडवळा येथील दिलीप ढवळे शेतकरी आत्महत्या प्रकरणा वरून उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे ढवळे व ईतर शेतकरी मला मातोश्रीवर भेटायला आले होते मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो. दोन दिवसांपूर्वी दिलीप ढवळे यांनी शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे चिट्टीत नाव लिहून आत्महत्या केली होती या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही माझी आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची इच्छा असून त्याचबरोबर पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्या प्रकरणी ओम राजेनिंबाळकर यांनाही न्याय मिळायला हवा अशी मागणी  करत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे यांची उस्मानाबाद मध्ये जाहीर प्रचार सभा झाली यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप ढवळे यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावाची चिठ्ठी घेऊन आत्महत्या केली होती, तसेच उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याची खंतही त्यांनी आपल्या चिठ्ठीत व्यक्त केली होती यावर आज उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  मी शब्द फिरवले असल्याची टीका शरद पवार वारंवार करत आहेत मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी मी हा युतीचा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवार यांच्या पोटात गोळा येत असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वर केलींय. राज्यघटनेतील देशद्रोहाचे कलम रद्द करणे शरद पवार यांना मान्य आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांची नक्कल करत त्यांच्या माफिनामाचा उल्लेख केला होता त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचावर नालायक कार्ट अशी टीका केली व असा व्यक्ती देशाचा पंतप्रधान नको असे मत व्यक्त केले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा का नाही आम्ही राम मंदिर बांधण्यावर ठाम असून याच विषयावर भाजपबरोबर युती केल्याचे सांगितले. शरद पवार हे महाराष्ट्रा बरोबर निष्ठेने राहिले  नाहीत, पवार हे महाराष्ट्राबरोबर निष्ठेने वागले असते तर महाराष्ट्राने शरद पवारांना डोक्यावर घेतले असते असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला याचवेळी तिकीट कापल्याने नाराज असलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे या सभेला उपस्थित होते त्यांना काळजी करण्याची गरज नाही. या पुढची जबाबदारी माझी आहे असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांना दिला
Last Updated : Apr 15, 2019, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.