ETV Bharat / state

Robbery in Osmanabad : उस्मानाबादेत दरोडेखोरांचा धुडगूस, महिलांना अत्याचाराची धमकी देत मारहाण करून घरे लुटले - Osmanabad Robbery news update

उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी दरोडेखोरांनी मारहाण करत लाखोंचा दरोडा घातल्याची घटना घडली ( Two Robbery in Osmanabad city) आहे. सोमवारी पहाटे कर्मवीरनगर, पोस्ट कॉलनी भागातील दोन घरांत दरोडेखोरांनी धुडगूस घातला.

Robbery in Osmanabad
उस्मानाबादेत दरोडेखोरांचा धुडगूस
author img

By

Published : Feb 8, 2022, 3:49 PM IST

उस्मानाबाद - शहरात दोन ठिकाणी दरोडेखोरांनी मारहाण करत लाखोंचा दरोडा घातल्याची घटना घडली ( Two Robbery in Osmanabad city) आहे. सोमवारी पहाटे कर्मवीरनगर, पोस्ट कॉलनी भागातील दोन घरांत दरोडेखोरांनी धुडगूस घातला. या दरोड्यात 22 तोळे सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आले. यादरम्यान घरातील लोकांनी विरोध केला असता या दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. केलेल्या मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

स्वच्छता निरीक्षक कन्हैय्या मदनुरकर व त्यांच्या पत्नींची प्रतिक्रिया
  • अत्याचाराची धमकी देत लुटले घर -
    दरोडेखोरांनी पुरुषांसह महिलांनाही लाकडाने मारहाण केली. त्यात एकाचा हात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. सध्या जखमींवर सोलापूर येथे पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चोरटे घरात घुसल्यानंतर घरातील महिला मुलीं सुरुवातीला दागिने देण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे दरोडेखोरांनी हातातील लाकडाने मारहाण सुरू केली. यानंतरही पैसे व दागिने मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चार ते पाच जणांपैकी दोघांनी दागिने द्या अन्यथा बरे वाईट केले जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर महिलांसह मुलींनी दागिने तसेच घरातील पैसे करून दिल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

कटावणीने कोयंडा तोडून केला आतमध्ये प्रवेश -
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोस्टकॉलनी परिसरातील गजानन मंदिराच्या बाजूला जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता निरीक्षक कन्हैय्या गंगाधर मदनुरकर (५२) वास्तव्यास आहेत. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाज्याचा कटावणीने आतील कोयंडा तोडून आत प्रवेश केला. सुरुवातीस दरवाजाचा आवाज येत असल्यामुळे मदनुरकर स्वत: झोपेतून जागे झाले. त्यावेळी दोघांनी कोणतीही विचारणा न करता त्यांच्या उजव्या हातावर लाकडाच्या दंडूक्याने वार केले.

जबर मारहाणीत मदनुरकर बेशुद्ध -
एकाने त्यांच्या पत्नी राजश्री यांनाही मारहाण करण्यात केली. त्यांचा आवाज ऐकून दोन मुलीही पळत आल्या. या दरम्यान मदनुरकर बेशुद्ध होऊन पडले. त्यावेळी घरातील महिला आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे चोरांनी अत्याचार करण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच चिल्लरचा गल्लाही नेला. जाताना चोरट्यांनी बाहेरून कडी लावून घेतली. तसेच कर्मवीरनगरमधील शाम शिनगारे यांना लाकडी ठाेकळ्यांनी छातीवर व पोटात मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पत्नीच्या कानातील दागिने हिसकावून घेतल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. कन्हैय्या मदनुरकर यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनेतील तिघांचीही प्रकृती ठिक आहे.

जिल्ह्यात दरोड्याचे प्रमाण वाढले -
याबाबत संबंधित कुटुंबियांच्या तक्रारीवरून आनंद नगर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंबंधी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धाडसी दरोडे, चोऱ्या, लुटमाऱ्या वाढत आहेत. त्यामुळे यावर आळा बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा - Jalna Police on stolen baby : चोरीस गेलेल्या बाळाला जालना पोलिसांनी काढले शोधून; महिलेला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.