ETV Bharat / state

दाऊतपुर येथील एकाच उमेदवारास दोन दोन निवडणूक चिन्ह

उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपुरच्या उमेदवारांना दोव वेगवेगळी चिन्ह दिल्याचे पहायला मीळत आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

two-election-symbols-for-the-same-candidate-from-dautpur
दाऊतपुर येथील एकाच उमेदवारास दोन दोन निवडणूक चिन्ह
author img

By

Published : Jan 9, 2021, 8:06 PM IST

उस्मानाबाद - ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून गाव पुढारी निवडणुक प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. मात्र, निवडणूक विभाग गोंधळात सापडला असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाऊतपुरच्या उमेदवारांना दोन वेगवेगळी चिन्ह दिली आहेत. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे यांची तक्रार केली आहे. हा घोळ तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी या दोघांनी घातला असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला आहे. सुभेदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की एकाच उमेदवारास दोन-दोन निवडणूक चिन्ह दिले आहेत त्यामुळे मतदारच नाही तर खुद्द उमेदवारही संभ्रमावस्थेत आहेत.

दाऊतपुर येथील एकाच उमेदवारास दोन दोन निवडणूक चिन्ह

याचे उदाहरणार्थ सांगायचे झाले तर दाऊतपुर येथील प्रवीण बनसोडे यांना प्रथम ऑटोरिक्षा हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी देण्यात आले होते. मात्र, उस्मानाबाद तहसिलदार यांच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बनसोडे यांचे चिन्ह बदलून कप बशी हे केले आहे. प्रवीण बनसोडे यांच्याप्रमाणेच इतर 31 उमेदवारांचे अशाच पद्धतीने चिन्हांमध्ये आदलाबदली करण्यात आली असून यामुळे उमेदवारांना मानसिक त्रासाला ही आता सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन-दोन निवडणुकीचे चिन्ह घेऊन प्रचार कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. यामुळे याप्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांच्या वरती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.