उस्मानाबाद- अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास १० वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीने तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेऊन अत्याचार केले होते. याप्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड.सचिन सूर्यवंशी यांनी न्यायालयात बाजू मांडली.
हेही वाचा-अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षाची भर रस्त्यात हत्या... चार संशयित हल्लेखोर ताब्यात
उस्मानाबाद तालुक्यातील धारूर या गावातील आरोपी कृष्णा दत्तू शिंदे याने पीडित अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले होते. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 13 जुलै ते 14 जुलै 2017 ला पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे, सातारा येथे घेऊन गेला आणि अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा नोंद झाल्यानंतर बेंबळी पोलिसांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
दरम्यान, आज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.राय यांच्यासमोर या प्रकरणी सुनावनी करण्यात आली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कृष्णा दत्तू शिंदे याला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले. आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 5 हजार रुपयाचा दंड तसेच कलम 63 नुसार 1 वर्षे सक्तमजुरी व 6 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली.
हेही वाचा-अनैतिक संबंधास सासू ठरली अडथळा; सूनेने प्रियकराच्या मदतीने काढला काटा