उस्मानाबाद- परतीच्या पावसामुळे जिल्हातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग दोन तीन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतातील पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख हे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी विनंती केली; परंतु तूर, उडीद, मुग, ऊस सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे यांना मदत करण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यता आहे, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावीच लागणार असल्याने केंद्राच्या मदतीशिवाय राज्य सरकार काही करू शकणार नाही, असे पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना सांगितले.