ETV Bharat / state

'तेर' येथील गोरोबा काकांचे मंदिर २ दिवसांसाठी बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Goroba Kaka Mandir Ter

कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून गेल्या 8 महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. त्याप्रमाणेच संत गोरोबा काकांचे मंदिरही बंद होते. मात्र, 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर मंदिरांसोबत हे मंदिर उघडण्यात आले. परंतु, उद्या कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे, मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी आज हे मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून उद्या देखील हे मंदीर बंद राहाणार आहे.

Goroba Kaka Temple
'तेर' येथील गोरोबा काकांचे मंदिर २ दिवसांसाठी बंद
author img

By

Published : Nov 25, 2020, 7:35 PM IST

उस्मानाबाद - राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही कोरोना विषाणू हद्दपार झालेला नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून गेल्या 8 महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. त्याप्रमाणेच तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिरही बंद होते. मात्र, 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर मंदिरांसोबत हे मंदिर उघडण्यात आले. परंतु, उद्या कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे, मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी आज हे मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून उद्या देखील हे मंदीर बंद राहणार आहे.

'तेर' येथील गोरोबा काकांचे मंदिर २ दिवसांसाठी बंद

ही माहिती संत गोरोबा काका व शिव मंदिर ट्रस्टचे प्रशासक पी. बी. भोसले यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केली. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता कार्तिकी एकादशीला भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. भाविकांसाठी मंदिर दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, धार्मिक विधी पार पाडले जातील, असे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

कार्तिक वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात प्रवेशबंदी

कार्तिक वारीच्या अनुषंगाने शासनाने पंढरपूर शहर व परिसरात प्रवेश बंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. खासगी वाहनाने पंढरपुरात जाणारा पालखी सोहोळाही रद्द करण्यात आला असल्याचे प्रशासक भोसले यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येणार असून तशा सूचना भाविकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

गोरोबा काकांचे मदिर असल्याने तेर गावाला प्रति पंढरपूर अशी ओळख

तेर येथे संत गोरोबा काका यांचे मंदिर आहे. त्यामुळे, तेर गावाला प्रति पंढरपूर अशी ओळख आहे. ज्यांना पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणे शक्य नाही, ते वारकरी तेर येथे येऊन गोरोबा काकांचे दर्शन घेतात.

पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा रद्द

पंढरपूर येथे होणारी कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना रोगाचा संसर्ग वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी देखील रद्द करण्यात आली होती. आता कार्तिकी वारी जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, विठू नगरीमध्ये दोन दिवसाची संचारबंदी जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू; कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची शाळेला पाठ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.