उस्मानाबाद - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी काल गुरुवार रात्री ८ वाजल्यापासून पासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आई तुळजाभवानीची आरती करून उस्मानाबाद शहरातील शिवाजी महाराज चौकात "रात्रभर आत्मक्लेश जागर गोंधळ" आंदोलन करण्यात आले.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री कडाक्याच्या थंडीतही रात्रभर आंदोलन करण्यात आले. सकाळी 6 वाजेपर्यंत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार शेतकऱ्याची सर्व प्रकारची आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याप्रमाणेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर निकाली काढा अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी कार्यकत्यांनी दिला आहे.
हेही वाचा - कोरोना लस मोफत द्या! बिहार निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ?