उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. राजकारण्यांनाही साहित्य संमेलनाच्या मंचावरती स्थान असायला हवं; कारण तेही साहित्यिक असतात, असे मत त्यांनी मांडले.
साहित्यिकांच्या मंचावर असावे की नाही यासंदर्भात वाद निर्माण होत होतो. या अनुषंगाने बोलताना, मी स्वतः साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे. त्यामुळे राजकारण्यांना वेगळे पाडायला नको, असे ते म्हणाले.