ETV Bharat / state

धक्कादायक..! दहावीत ९४ टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या - Kalamb

अक्षय देवकरने नुकत्याच झाललेल्या १० वी च्या परिक्षेत ९४ टक्के गुण मिळाले होते. त्याला गणितात ९९ टक्के गुण आहेत. मात्र लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षयने स्वतःला संपवून घेतले. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे अक्षयसारख्या विद्यार्थ्यांवर जीवन संपवण्याची वेळ आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

हताश अक्षयची आत्महत्या
author img

By

Published : Jun 21, 2019, 8:54 PM IST

Updated : Jun 21, 2019, 10:26 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षय शहाजी देवकर या 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले मात्र कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे.

हताश अक्षयची आत्महत्या

अक्षयच्या वडील शहाजी देवकर यांना एकूण पाच एकर कोरडवाहू जमीन आहे. याच जमिनीत उत्पन्न घेऊन शहाजी देवकर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे अक्षयला त्याच्या घरच्या परिस्थितीची जाणीव झाली होती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन यश मिळवल्याने या गावात अक्षयचे बॅनरही लावण्यात आले. मात्र अक्षयला शाहू कॉलेजमध्ये प्रवेश होत हवा होता आणि शाहू कॉलेजच्या पहिल्या लिस्टमध्ये अक्षयचे नाव नसल्याने अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलले.

student suicide
हताश अक्षयची आत्महत्या

अक्षयला गणितामध्ये 99 टक्के गुण मिळाले. अक्षय हा लहानपणापासून हुशार होता. प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत होता. त्यामुळे शहाजी देवकर यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आठवीच्या नंतर अक्षयला लातूरच्या सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले होते. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्यामुळे त्याने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती 94 टक्के गुण मिळवूनही शाहू कॉलेज लातूर येथे नंबर लागतो की नाही आणि प्रवेश मिळाला नाही तर मॅनेजमेंट कोट्यातून पैसे भरायची वेळ येईल आणि आई-वडिलांची परिस्थिती नाही याची चिंता सतावत होती. त्यामुळेच त्याने स्वतःचे जीवन संपवले.

  • आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!

    — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याप्रकरणी छत्रपती संभाजी महाराज यांनीही ट्विट करत अक्षयने केलेल्या आत्महत्येबद्दल व मराठा समाजाला आरक्षणासंबंधी होत असलेल्या विलंबाबद्दल खेद व्यक्त केला आहे.

  • केवळ पुढाऱ्यांनीच नाही तर अधिकाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत शिक्षण मोफत करा. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. pic.twitter.com/mg8MzJmCVw

Intro:
मोठ्या कॉलेजला प्रवेश मिळत नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे.
लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षय शहाजी देवकर या 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले मात्र कॉलेजच्या प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे अक्षयच्या वडील शहाजी देवकर यांना एकूण पाच एकर कोरडवाहू जमीन जमीन आहे याच जमिनी उत्पन्न घेऊन शहाजी देवकर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यामुळे अक्षयला त्याच्या घरच्या परिस्थितीची झाली होती घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन यश मिळवल्याने या गावात अक्षयचे बॅनरही लावण्यात आले मात्र अक्षयला शाहू कॉलेजमध्ये प्रवेश होत हवा होता आणि शाहू कॉलेजच्या पहिल्या लिस्टमध्ये अक्षयचे नाव नसल्याने अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलले अक्षयला गणितामध्ये 99 टक्के गुण मिळाले. अक्षय हा लहानपणापासून हुशार होता प्रत्येक वस्तू व श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत होता त्यामुळे शहाजी देवकर यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आठवीच्या नंतर अक्षयला लातूरच्या सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले होते मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्ती मिळणार नाही त्यामुळे त्याने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती 94 टक्के गुण मिळवूनही शाहू कॉलेज लातूर येथे नंबर लागतो की नाही आणि प्रवेश मिळाला नाही तर मॅनेजमेंट कोट्यातून पैसे भरायची वेळ येईल आणि आई-वडिलांची परिस्थिती नाही याची चिंता सतावत होती त्यामुळेच त्याने स्वतःचे जीवन संपवले याप्रकरणी छत्रपती संभाजी महाराज यांनीही ट्विट करत अक्षय ने केलेल्या आत्महत्या बद्दल व मराठा समाजाला आरक्षण आवाज संबंधी होत असलेल्या विलंबाबद्दल खेद व्यक्त केला आहे

Body:यात vis व byte आहेत

अक्षय च्या आईचा byte
अक्षयच्या बहिणीचा byte
अक्षय भाऊ आणि काका यांचा byte

त्याचबरोबर पोलीस पाटील आणि एका ग्रामस्थाचा byte या सोबत जोडत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jun 21, 2019, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.