ETV Bharat / state

दारूच्या नशेत आईशी भांडणाऱ्या बापाची हत्या;  मुला विरुद्ध गुन्हा दाखल - मुलाकडून दारूड्या बापाचा खून

पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी अनिता लाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून हत्या केली
author img

By

Published : Nov 21, 2019, 4:22 PM IST

Updated : Nov 21, 2019, 4:48 PM IST

उस्मानाबाद - पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. पळसप येथील दगडप्पा लाकाळ यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे होत होती. दगडप्पा लाकाळ यांना दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत ते अनेकदा पत्नीला मारहाण करायचे.

मंगळवारी(दि.19 नोव्हें)ला रात्री दगडप्पा व त्यांच्या पत्नीत जोरदार भांडण झाले. यावेळी दगडप्पा यांनी पत्नीला मारहाण केली. संबंधित प्रकारासंर्भात विचारणा करत असताना मुलगा बालाजी व त्याच्या वडिलांमध्ये शाब्दिक भांडण झाले. याचे रुपांतर हाणामारीत झाले; आणि मुलाने काठीने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत दगडप्पा यांना गभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मृताची पत्नी अनिता लाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Intro:दारुच्या नशेत धुंद असणाऱ्या बापालाच संपवले

उस्मानाबाद- जिल्ह्यातील पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून खून केल्याची घटना घडली आहे पळसप येथील दगडप्पा लाकाळ यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे होत होते दगडप्पा लाकाळ यांना दारूचे व्यसन होतं दारूच्या नशेत ते घरी पत्नीला सारखेच मारहाण करीत होते त्यामुळे रोजच भांडण होत असल्याने घरात कायमस्वरूपी तणावाचे वातावरण होते मंगळवारी रात्री ही दगडप्पा व त्यांची पत्नी अनिता मध्ये जोरदार भांडण झाले यावेळी दगडप्पा यांनी पत्नीला मारहाण केली याबाबत विचारणा करत असताना मुलगा बालाजी लाकाळ व दगडुला यांच्यामध्ये शाब्दिक भांडण झाले या शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले यात बालाजी लाकाळ याने हातात वेळूच्या काठीने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना मारहाण करून गंभीर दुखापत केली यात डोक्याला गंभीर मार लागल्याने दगडप्पा लाकाळे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मयताची पत्नी अनिता लाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहेBody:यात गावचे vis आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Nov 21, 2019, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.