ETV Bharat / state

सैनिकाच्या गर्भवती पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न, भूममधील घटना - भूम

भूम तालुक्यातील घुलेवाडी गावामध्ये राहणाऱ्या एका गरोदर महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाण झालेली महिला आठ महिन्याची गरोदर आहे.

सैनिकाच्या गर्भवती पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न
author img

By

Published : May 31, 2019, 9:46 PM IST

Updated : Jun 1, 2019, 10:45 AM IST

उस्मानाबाद- भूम तालुक्यातील घुलेवाडी गावामध्ये राहणाऱ्या एका गरोदर महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाण झालेली महिला आठ महिन्याची गरोदर आहे. तर तिचे पती भारतीय सैन्यामध्ये जम्मू-काश्मीर(लेह) या ठिकाणी कार्यरत आहेत.

दि. ३० मे रोजी पीडित महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेल्यानंतर आरोपी गोकुळ बाजीराव गोपाळघरे हा अचानक पाठीमागून आला आणि तिचा हात धरून जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित महिलेने आरडाओरड केल्याने तिची सासू घटनास्थळी आली. यामुळे रागावलेल्या गोकुळने व त्याच्या भावांनी पीडितेची पोटात व छातीवर लाथ मारून गंभीर जखमी केले. यामुळे पीडित गरोदर या महिलेला उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पीडित महिलेने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत गोकुळ गोपाळघरे, भरत गोपाळघरे विठ्ठल गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, नामदेव गोपाळघरे, गणेश गोपाळघरे, सुशाला गोपाळघरे यांची नावे आहेत. यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Intro:
भारतीय सैनिकांच्या पत्नीवर मारहाण करून बलात्काराचा प्रयत्न; पीडिता आठ महिन्याची गरोदर

उस्मानाबाद -भूम तालुक्यातील घुलेवाडी या गावातील एका पीडित महिलेला मारहाण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ही महिला आठ महिन्याच्या गरोदर आहेत तर यांचे पती भारतीय सैन्यामध्ये जम्मू काश्मीर (लेह) या ठिकाणी कार्यरत आहेत दि. ३० मे रोजी टॉयलेट साठी घराबाहेर गेल्यानंतर गोकुळ बाजीराव गोपाळघरे हा अचानक पाठीमागून आला आणि हात धरत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यानंतर पीडिता ओरडल्यानंतर पीडितेची सासू अली या मुळे रागावलेल्या गोकुळ याने व याच्या भवानी पीडितेची पोटात व छातीवर लाथ मारत गंभीर जखमी केले यामुळे पीडित गरोदर या महिलेला उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे पीडित महिलेने पोलिस अधीक्षक याना दिलेल्या तक्रारीत गोकुळ गोपाळघरे भरत गोपाळघरे विठ्ठल गोपाळ घरे बाजीराव गोपाळघरे नामदेव गोपाळघरे गणेश गोपाळघरे सुशाला गोपाळघरे यांची नावे असून यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलीBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jun 1, 2019, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.