सोलापूर - उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा तालुक्यातील एका सलून व्यावसायिकाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. मनोज दगडू झेंडे (वय 35, रा.ता सांझा, जि.उस्मानाबाद) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.
हेही वाचा - अजित पवारांनी मतदारांना तिजोरीच्या चाव्याचे आमिष न दाखवता जनतेसाठी पॅकेज द्यावे - उपाध्ये
आत्महत्या करण्यापूर्वी मनोज झेंडे यांनी चिट्टी लिहून मृत्यूचे कारण सांगून विष प्राशन केले. नातेवाईकांनी मनोज यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
..अखेर त्यांनी चिट्टी लिहून आत्महत्या केली
मनोज यांनी अतिशय भावनिक पत्र लिहून आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये. गेल्या अनेक महिन्यांपासून मी 5 हजार पगारावर काम करत आहे. त्यावर माझे व माझ्या कुटुंबाचे घर खर्च भागत नाही, असे भावनिक पत्र त्यांनी लिहिले आणि विष प्राशन केले. वीष प्राशन केल्यानंतर त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
![Salon shopkeeper suicide news Osmanabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11367661_thumbn.jpg)
सततच्या लॉकडाऊन आणि कठोर नियमावलीमुळे नाभिकांना आत्महत्या करण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नाही. शासनाने याची गंभीर दखल घेत मनोज यांच्या वारसांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, सलून दुकानधारकांवर असलेले नियम शिथिल करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
![Salon shopkeeper suicide news Osmanabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11367661_thum.jpg)
हेही वाचा - व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी : अपक्ष उमेदवार शैला गोडसे