उस्मानाबाद - सुजय विखे-पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तुळजापुरातील तुळजाभवानीचे दर्शन घेतले. विशेष हेलिकॉप्टरने विखे-पाटील दर्शनासाठी आले होते.
सतत माध्यमासमोर हसत खेळत वावरणारे राधाकृष्ण विखे पाटील हे मुलाच्या म्हणजे सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर माध्यमापासून पासून दूर गेले आहेत. सुजय विखेंच्या प्रवेशानंतर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तुळजापूर दौराही त्यांनी अत्यंत गुप्तपणे केला. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, आमदार मधुकर चव्हाण यांचे स्वीय सहायक जाधव, तसेच पंचायत समितीचे सभापती गायकवाड हे उपस्थित होते.
तुळजाभवानीच्या दर्शनानंतर लोकसभेच्या अनुषंगाने कोणत्याही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी न घेता विखे-पाटील हे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाले.