ETV Bharat / state

अपंगत्वावरही 'विजय', पीएच. डी. प्रवेश परीक्षेत पात्र; अपंग असल्याने गाईडने नाकारले - अपंग तरुणाला पीचडी गाईडने नाकारले

शरीराने अपंग असतानाही त्याने पीएच. डी. च्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरला. त्याला 'मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान' हा पीएचडीचा विषय ठरला. विद्यापीठामध्ये प्रस्ताव सादर केला. मुलाखत देखील झाली. मात्र, तो  अंपग असल्याने त्याला गाईडने नाकारले. विजय नाना सरदार, या तरुणाची ही यशोगाथा आहे.

PHD guide reject due to physical disability
अपंगत्वावरही 'विजय'
author img

By

Published : Dec 3, 2019, 11:39 PM IST

Updated : Dec 3, 2019, 11:52 PM IST

उस्मानाबाद - हात-पाय सक्षम असताना देखील परीक्षा द्यायचे म्हटले की तोंडाला फेस येतो. मात्र, शरीराने अपंग असतानाही त्याने पीएच. डी.च्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरला. त्याला 'मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान' हा पीएच. डी. चा विषय ठरला. विद्यापीठामध्ये प्रस्ताव सादर केला. मुलाखत देखील झाली. मात्र, तो अंपग असल्याने त्याला गाईडने नाकारले. विजय नाना सरदार, या तरुणाची ही यशोगाथा आहे.

पीएच. डी. प्रवेश परीक्षेत पात्र; मात्र, अपंग असल्याने गाईडने नाकारले

विजय २६ वर्षाचा असून त्याची उंची फक्त दीड फूट आहे. त्याने ग्रामीण भागातील धनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण कळंब शहरात झाले. मात्र, अपंग असल्याने त्याने घरीच अभ्यास केला. कधीही कुठला शिकवणी वर्ग लावला नाही. मात्र, तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्यानी संशोधन करायचे ठरवले.

विजयाच्या शिक्षण ग्रामीण भागातील धनेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण कळंब शहरात. अपंग असल्याने शाळेत जाता येत नव्हते. सेल्फ स्टडी करून त्याने आपले हे शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्चशिक्षित झाल्यानंतर विजयला डॉक्टरेट मिळविण्याचे वेध लागले. ''मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान" या विषयावर त्याने संशोधन करण्याचे ठरविले. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अंत्यत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी. साठी प्रवेश परीक्षा दिली. त्या परीक्षेत तो पात्रही ठरला. त्यानंतर विद्यापीठामध्ये प्रस्तावना सादर केली. त्यानंतर पीएचडीसाठी मुलाखत दिली. अपंग असून त्याने स्वतः माजलगाव, बीड, जालना, उस्मानाबाद येथे जाऊन गाईडची भेट घेतली. मात्र, सर्व सोपस्कार पार पडूनही गाईडनी फक्त अपंगत्वामुळे त्याला नाकारले.

विजयला त्याची आई आणि मित्रांची साथ मिळाली. सर्वजण त्याला लहान मुलाप्रमाणे उचलून प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात. गाईड मिळाला नाही म्हणून विजयने जिद्द सोडली नाही. मात्र, गुणवत्ता असूनही फक्त अपंगत्वामुळे गाईडने डावलले असल्याची खंत आईने व्यक्त केली. मात्र, निदान अपंग दिनाच्या दिवशी तरी एखादा गाईड त्याच्या मदतीला समोर येईल का? हाच प्रश्न आहे. विजयची जिद्द पाहून शरीराने धडधाकट असलेल्या माणसाला हेवा वाटणार, हे मात्र नक्की.

Intro:सर हे चांगला आवाज देऊन pkg करावे स्टोरी छान आहे असं मला वाटत त्यासाठी स्क्रिफ्ट मोठी दिली

अपंग दिन विशेष
विद्या पंडितांनो थोडंस लाजा आणि अपंग विजयला 'गाईड' करा

उस्मानाबाद - दिव्यांगत्व,मदतीचे खुंटलेले, हात,समोर उभा असलेला संकटाचा डोंगर,जीवनसंघर्ष पाठ सोडायला तयार नाही,तरीही ताठ कण्याने,स्वाभिमानाने जगण्याची लढाई सुरुच असलेल्या विजयची ही लढाई सर्वानाच लाजवेल अशीच आहे हल्ली 'दोन हात', आणि ''दोन पाय' सक्षम असलेल्या तरुणांनाही परीक्षा द्यायचं म्हटलं की तोंडाला "फेस" येतो दहावी-बारावीच्या परीक्षेतही कॉप्या करून पास होणाऱ्या बहाद्दरांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही मात्र या शरीराने अपंग विजयच्या-विजयाची,यशोगाथा पाहिल्यानंतर हातपाय धडधाकट असलेल्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या व परिस्थितीला दोष देणाऱ्या सर्वांनाच लाज वाटायला हवी शरीराने अपंग असलेल्या विजयला संशोधन करावयाचे आहे त्यासाठी प्रवेश परीक्षा देऊन राज्यात चौथा क्रमांक मिळवला मात्र केवळ अपंग असल्याने विजयला आज पर्यंत गाईड मिळाला नाही त्यामुळे मोठ-मोठे क्लासेस सुरू विद्या पंडितांच्या बुद्धीची कीव करावी लागेल विजयने डॉक्टरेट मिळविण्यासाठी माजलगाव,बीड,उस्मानाबाद, जालना येथे जाऊन अनेक गाईडची भेट घेतली मात्र अपंग असल्याने त्याला सर्वत्र डावलले विजयचे २६ वर्षाचा आहे तर त्याची उंची केवळ दीड फूट याची.विजयने आत्तापर्यंत ना कुठले क्लास लावले ना नाही भरभक्कम पैसे उकळणाऱ्या शाळेत ऍडमिशन घेतले.
ग्रामीण भागातील धनेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण कळंब शहरात. अपंग असल्याने शाळेत जाता येत नव्हते सेल्फ स्टडी करून त्याने आपले हे शिक्षण पुर्ण केले,पुढे उच्चशिक्षित झाल्यानंतर विजयला डॉक्टरेट मिळविण्याचे वेध लागले. ''मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान" या विषयावर त्याने संशोधन करण्याचे ठरविले देखील या साठी त्याने प्रामाणिक प्रयत्न केले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने परिश्रम घेत विजयने PHD साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश परीक्षा दिली, याच PET परीक्षेत विजयने राज्यात चौथा क्रमांक मिळवला.त्यानंतर त्याने आपली प्रस्तावना विद्यापीठात सादर केली. त्यानंतर RRC म्हणजेच PHD साठी interview दिला त्यातही selection झालं एवढे सर्व सोपस्कार पार पडूनही विजय अपंग आहे म्हणून स्वतःला विद्या पंडित समजणाऱ्या गाईडनी विजयला नाकारलं. विजय एवढया अग्निदिव्यातून जात असताना आई आणि मित्रांची साथ मिळाली हे सर्व 26 वर्षाचे विजयला लहान मुलांप्रमाणेच सर्वत्र उचलून नेऊन डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत गाईड मिळाला नसल्यामुळे विजय जिद्द सोडळलेली नाहीये,सर्व गुणवत्ता असूनही केवळ शारीरिक अपंग असल्याने विजयला डावलले जात असल्याची खंत आई व्यक्त केली आज आपण जागतिक अपंग दिन साजरा करत आहोत मात्र हा अपंग दिवस हा शारीरिक अपंग दिवस म्हणून पाळण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या खचलेल्या अपंगाचा दिवस म्हणून पाळायला हवा अपंगत्वामुळे हरून न जाता जिद्द व परिश्रम घेऊन डॉक्टरेट मिळविण्याची जिद्द उरी बाळगलेल्या विजयला नाकारणारे गाईड हे नक्कीच या अपंग दिवसास पात्र ठरणारे आहेत अपंगान बद्दल कळवळा असणाऱ्या शासनाने लवकरात लवकर समोर येऊन विजयला मदत करण्याची गरज आहे.

(बाईट-विजय नाना सरदार)
बाईट-विशाखा नाना सरदार आईBody:यात आई व विजय चा byte ट्रॉफी, घर,आणि त्याचे vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Dec 3, 2019, 11:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.