ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे राजीनामे भाजपच्या खिशात...तुळजापूर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आगळावेगळा पक्षप्रवेश - तुळजापूर विधानसभा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव गोकुळ शिंदे यांनी आज तुळजापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थीतीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या लेटरहेडवर लिहिलेला आपला राजीनामा चंद्रकांत पाटलांकडे सुपूर्त केल्याने, आता राष्ट्रवादीचे राजीनामे भाजपच्या खिशात असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

तुळजापूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:48 PM IST

उस्मानाबाद - भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील आज तुळजापूर येथे आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गोकुळ शिंदे यांनी आपल्या राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देखील चंद्रकांत पाटलांकडे सुपूर्त केलाव आहे.

तुळजापूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

गेले 35 वर्षापासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले गोकुळ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिला आहे. पक्ष प्रवेश करताना घड्याळ्याचे चिन्ह असलेल्या लेटरहेडवर लिहिलेला आपला राजीनामा त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे दिला. यावेळी राजीनाम्यात त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर जोरदार टीका केली. राजीनाम्यात एकीकडे पक्षावर टीका करत असताना त्याच राजीनाम्यात त्यांनी भाजपची प्रशंसा केली आहे. भाजप हा विकासाची कामे करणारा पक्ष असून या कामावर विश्वास ठेवूनच आपण भाजप प्रवेश करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. शिंदे यांचा हा भाजप प्रवेशाचा मेळावा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अनिल काळे यांच्यासाठी भरवला गेल्याचे बोलले जात आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी भाजपाकडून सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी विधानसभा लढवली होती. मात्र यावेळी भाजपाचे अनिल काळे यांना संधी दिली जाईल असे बोलले जात आहे.

Intro:( राष्ट्रवादीच्या लेटर पॅड असलेला फोटो तो मुख्य लावावा)

राष्ट्रवादीचे राजीनामे भाजपच्या खिशात; राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे चिन्ह असलेला लेटर पॅड वरती भाजपाची प्रशंसा..!

स्मानाबाद - भाजपा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील आज तुळजापूर येथे आले होते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील नगरसेवकांसह बहुसंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला मात्र हा प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी पदाचा राजीनामा भाजपचा स्टेजवरती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला. गेले 35 वर्षापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले गोकुळ शिंदे यांनी असा राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव पदाचा अजब-गजब राजीनामा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे सुपूर्द केला या राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचा लोगो असलेल्या लेटर पॅड वरती हा राजीनामा देण्यात आला राजीनाम्यात राष्ट्रवादी बद्दल टीका करत राष्ट्रवादी घराणेशाहीची पार्टी असून महत्त्वाचे सर्व पद एकाच घरात दिले जातात अशी टीका करत याच राजीनाम्याच्या लेटरपॅडवर भाजपाची प्रशंसा केली भाजपा हा विकास कामे करणारा पक्ष असून या कामावरतीच विश्वास ठेवून मी आज भाजपात प्रवेश करत असल्याचे राष्ट्रवादीच्या लेटर पॅड वरील राजीनाम्यात दिले तत्पूर्वी शिंदे यांनी जोरदार भाषणही चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर केले हा भाजपा प्रवेशाचा मेळावा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले अनिल काळे यांच्यासाठीच भरवला गेला असल्याचे बोलले जात आहे तुळजापूर विधानसभा मतदार संघात यापूर्वी भाजपाकडून सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी विधानसभा लढवली होती आताही ही जागा भाजीपाला सुटेल असे सांगण्यात येत आहे मात्र यावेळी भाजपाचे अनिल काळे यांना संधी दिली जाईल असे बोलले जात आहेBody:यात vis व राष्ट्रवादी लोगो असलेला फोटो लावावा Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.