ETV Bharat / state

ओटीपी सांगणे पडले महागात! चारशे रुपयाच्या चप्पल खरेदीत डॉक्टरांना लाखाचा ऑनलाईन गंडा - online fraud in osmanabad

सरकारी स्त्री रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.चंद्रकांत लामतुरे यांनी शॉपक्लूज शॉपिंग वेबसाईटवरुन 470 रुपयांची चप्पल मागवली होती. यासाठी त्यांनी रक्कमही तत्काळ भरली. मात्र, त्यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय
पोलीस अधीक्षक कार्यालय
author img

By

Published : Dec 3, 2020, 6:43 PM IST

Updated : Dec 3, 2020, 7:04 PM IST

उस्मानाबाद- कोरोना महामारीत बाजारपेठेत वस्तू खरेदी करणे टाळत ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याचा ग्राहकांना फटका बसत असल्याची घटना समोर आली आहे. शहरातील सरकारी रुग्णालयात सेवेत असलेल्या डॉ. चंद्रकांत लामतुरे यांना चारशे रुपयांची चप्पल खरेदी करताना एक लाख रुपये गमवावे लागले आहेत.

ई-कॉमर्स साईटवरुन मागवलेली चप्पल उस्मानाबादेतील डॉक्टरला चांगलीच महागात पडली आहे. सरकारी स्त्री रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. चंद्रकांत लामतुरे यांनी शॉपक्लूज शॉपिंग वेबसाईटवरुन 470 रुपयांची चप्पल मागवली होती. यासाठी त्यांनी रक्कमही तत्काळ भरली. मात्र, त्यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

चारशे रुपयाच्या चप्पल खरेदीत डॉक्टरांना लाखाचा ऑनलाईन गंडा

हेही वाचा-ठाणे: दाम्पत्यावर हल्ला करून लुटून पळालेले दोन चोरटे गजाआड; एक फरार

ओटीपी दिला अन् खात्यातून कमी झाले लाख रुपये!

कंपनीने डॉक्टरांना त्यांची ऑर्डर रद्द झाल्याचे एसएमएसद्वारे कळविले. त्यामुळे डॉ. लामतुरे यांनी संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी समोरील व्यक्तीने पैसे परत पाठवतो, असे म्हणून डॉ. लामतुरे यांच्या बँकेची सविस्तर माहिती मागविली. त्यांच्याकडील डेबिट कार्डचा 16 अंकी क्रमांक व पाठीमागील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक संबंधित व्यक्तीने डॉ. लामतुरे यांच्याकडून विचारून घेतले. त्यानंतर ओटीपी नंबर संबंधित व्यक्तीने विचारून घेतलाडॉ. लामतुरे यांनी कुठलाही विचार न करता आपला ओटीपी क्रमांक संबंधित अज्ञात व्यक्तीला दिला. त्यानंतर डॉ. लामतुरे यांच्या बँक खात्यामधून 1 लाख 27 हजार 714 रुपये कमी झाल्याचा एसएमएस आला. खात्यामधून पैसे कमी झाल्याचा एसएमएस पाहिल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. डॉ. लामतुरे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-वणी तालुक्यातील कोंबडबाजारावर धाड; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, अज्ञात व्यक्तीला बँकेचा ओटीपी क्रमांक सांगू नये, असे पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून वारंवार आवाहन करण्यात येते. तसेच खासगी व सरकारी बँकांकडून ओटीपी कुणालाही सांगू नये, अशी जनजागृती करण्यात येते. सवलतींसाठी वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईटवरून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसत असल्याचे विविध घटनांमधून आजवर समोर आले आहे.

Last Updated : Dec 3, 2020, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.