ETV Bharat / state

उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, प्रशासनाकडून दोन दिवसीय जनता कर्फ्यूचे आवाहन - उस्मानाबाद संचारबंदी

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 62 झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

two-day public curfew in osmanabad
उस्मानाबाद प्रशासनाकडून दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आवाहन
author img

By

Published : May 30, 2020, 8:02 PM IST

Updated : May 30, 2020, 8:29 PM IST

उस्मानाबाद - कोरोना विषाणूने जिल्ह्यासाठी ओलांडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 62 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासाठी आजपासून (शनिवार) दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

नागरिकांकडून या उपाययोजनांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नसून अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 30 व 31 मे 2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात "जनता कर्फ्यू" चे आदेश दिले असून नागरिकांनी घरामध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. या जनता कर्फ्यू च्या दरम्यान रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीची दुकाने, आदी चालू राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवासाठी फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असेल. बाकीच्या सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी केले आहे.

Last Updated : May 30, 2020, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.