ETV Bharat / state

उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकरांचा अर्ज दाखल; गट-तट संपल्याचा शिवसेनेचा दावा - yuti

विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड तिकीट कापल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

ओमराजे निंबाळकर
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:40 AM IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना उप-नेते आमदार तानाजी सावंत, शंकर बोरकर, कैलास पाटील यांच्या उपस्थित होते.

ओमराजे निंबाळकर

यावेळी नाराज असलेले रवींद्र गायकवाड आणि त्यांचे समर्थक आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे गैरहजर होते. रवींद्र गायकवाड विद्यमान खासदार आहेत. त्यांचे तिकीट कापल्यामुळे समर्थक नाराज असल्याचे बोलले जात आहे. रवींद्र गायकवाड यांची मनधरणी सुरू असून यासाठी त्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवले होते. नक्कीच मिळून आमच्यासोबत काम करण्यास ते येतील. गायकवाड हे हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते पुन्हा जोमाने कामाला लागतील, असा विश्वास पालकमंत्री खोतकरांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनीही आमच्यात आता कुठलेच गट-तट राहिले नासून आम्ही पुन्हा एकत्र येऊन मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी उस्मानाबादचा उमेदवार निवडून देणार असल्याचे सांगितले.

Intro:25_mar_mh_25_osmanabad_sena_form

आमच्यातली गटबाजी संपली आमचा उमेदवार जोमाने निवडून आणू - शिवसेना

उस्मानाबाद लोकसभेसाठी आज शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आला उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जवळपास सात हजार लोकांच्या समुदाया सह पालक मंत्री अर्जुन खोतकर शिवसेना उपनेते आ.तानाजी सावंत, शंकर बोरकर, कैलास पाटील यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला मात्र यावेळी नाराज असलेले रवींद्र गायकवाड व त्यांचे समर्थक आ.ज्ञानराज चौगुले माजी आ.ज्ञानेश्वर पाटील हे मात्र गैरहजर होते रवींद्र गायकवाड विद्यमान खासदार आहेत त्यांचे तिकीट कापल्यामुळे समर्थक नाराज आहेत यावेळी पालक मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले की रवींद्र गायकवाड यांची मनधरणी सुरू असून यासाठी त्यांना मातोश्रीवर ती बैठकीसाठी बोलवले होते नक्कीच मिळून आमच्यासोबत काम करण्यास येथील रवींद्र गायकवाड हाडाचे शिवसैनिक आहेत त्यामुळे पुन्हा जोमाने कामाला लागतील त्याचबरोबर शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी सांगितले की आज काही कारणास्तव खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे समर्थक आले जरी नसले तरी आमच्यात आता कुठलेच गट-तट राहिले नाहीत उद्यापासून आम्ही पुन्हा एकत्र येऊन मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी उस्मानाबादचा उमेदवार निवडून देणार आहोतBody:यात ओमराजे निंबाळकर व तानाजी सावंत यांचा बाई असून आणखी एक पालकमंत्र्यांचा वाईट मौजे वरतीच पाठवत आहे व त्याचे vis मोजो वरती पाठवले आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.